मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जानेवारी 2020 (11:42 IST)

मूत्रमार्ग संसर्ग कारण आणि निदान

कधी कधी काही कारणास्तव लघवीला जाणे होत नाही, जास्त काळापर्यंत लघवी रोखल्याने मूत्रमार्गात जिवाणू उद्भवतात त्यामुळे लघवीची लागण होते. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बाहेर जाऊन काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये हा त्रास वाढतो. मसालेदार पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे, गरजेपेक्षा जास्त वेळा लघवीला जाणे, किंवा लघवीला थांबवणे अश्या कारणांमुळे युरीन इन्फेक्शन होते. युरीन इन्फेक्शनची लक्षणे काय असतात हे आपण जाणून घेऊ या.
  
लक्षण :-
1  लघवी करताना जळजळ होणे
2  लघवी करताना वेदना होणे
3  वारंवार लघवी येणे
4  लघवीचा गडद रंग असणे
5  लघवीला अधिक दुर्गंध येणे
5  गुप्तांगात खाज येणे
6  ओटीपोटातून कळ येणे
7  लघवी करताना रक्त येणे
8  थंडी ताप येणे 
9 थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
10 लघवी थांबून थांबून होणे
11 मधुमेहाचे (शुगर)रुग्ण असल्यास
12 पाणी कमी पिणे
13 गरोदरपणात इन्फेक्शन होणे
14 अस्वच्छ राहणी
15 मासिक पाळीच्या काळात हे आजार जास्त पसरते
16 मणक्यात इजा झालेली असल्याने मूत्राशय निकामी झाल्याने
17 भूक न लागणे
18 आळसपणा जाणवणे
19  वारंवार लघवी होण्याची भीती होणे
20 कंबर दुखणे
 
हे इन्फेक्शन किडनी, गर्भाशय कुठे ही असू शकते असे घडल्यास काळजी घेणे आवश्यक आहे.
 
युरीन इन्फेक्शन वर उपचारासाठी काही घरगुती उपाय
 
1 रात्री 1 चमचा धणे पाण्यात भिजवून सकाळी ते बारीक करून गाळून घ्यावे. त्यात खडीसाखर घालून पिऊन घ्यावे. असे केल्यास लघवी करताना होणारी जळजळ कमी होऊ लागते.
2 दोन ते तीन चमचे आवळ्याच्या रसात मध टाकून दिवसातून 2 -3 वेळा घेतल्याने लघवीच्या त्रास कमी होतो आणि लघवीला होणारी जळजळ कमी होते. 
3 धणे आणि आवळा चूर्ण समप्रमाणात मिसळून रात्री पाण्यात भिजवून सकाळी गाळून हे पाणी पिण्याने युरीन इन्फेक्शनच्या त्रासातून मुक्तता होते.
4 गव्हाचे 10 - 15 दाणे एका ग्लासात भिजवून ठेवावे. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून ह्यात साखर टाकून पिण्याने लघवी करताना जळजळ होण्याची समस्या नाहीशी होते.  
5 पाच ते सहा वेलचीची पूड 1 कप पाणी आणि 2 कप दुधात घालून उकळून घ्यावे. गार झाल्यावर साखर घालून अर्ध्या-अर्ध्या तासाने हे पिण्याने फायदा होतो.
6 वेलचीचे दाणे आणि सुंठांचे चूर्ण समप्रमाणात घेऊन डाळिंबाच्या रसात किंवा दह्यात मिसळून त्यात काळं मीठ टाकून हे पाणी पिण्याने युरीन इन्फेक्शनचा त्रास दूर होतो.
7 नारळ पाण्यात गूळ आणि धणे पावडर मिसळून प्यायल्याने युरीन इन्फेक्शन दूर होते.
8 एक कांदा घेऊन त्याला बारीक चिरून 2 कप पाण्यात उकळून पाणी 1 कप झाल्यावर थंड करून प्यायल्याने युरीन इन्फेक्शन बरे होते.
 
हे लक्षात घ्या :-
* बऱ्याच वेळा स्त्रिया लघवी थांबून ठेवतात असे करणे धोकादायक असू शकते. याने मूत्र संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असते.
* नेहमी स्वछतागृहाचा वापर करावा.
* पाळीत पॅड्स बदलत राहणे गरजेचे असते त्या मुळेपण संसर्ग होते.
* अंतर्वस्त्र नेहमी सूतीचे वापरावे.
* कपडे जास्त घट्ट नसावे.
* युरीन इन्फेक्शन झाल्यास चहा, कॉफी आणि चॉकलेटच्या सेवनापासून दूर राहावे.
* व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचा रस घेणे योग्य ठरेल. नारंगी, मोसंबी, लिंबाचा रस घेतल्याने संसर्ग दूर होण्यास मदत होते.
* पाणी जास्तीच जास्त पिण्याने या रोगाचा नायनाट होतो.
* अननसाच्या रसाचे सेवन करावे.