1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 9 मार्च 2021 (17:38 IST)

मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी घरगुती उपाय

मासिक पाळी नियमित असणे आरोग्यासाठी योग्य असतं. अनेक स्त्रियांची पाळी येण्याची वेळ निश्चित नसते त्यामुळे अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं. अनेकांना कधी कधी पाळी लवकर येते तर कधी उशिरा तर कधी-कधी दोन-तीन महिने उलटले तरी येतच नाही. पाळीवेळेवर येणे निरोगी असण्याचे लक्षणे असतात.
 पाळीचे चक्र 21 किंवा 35 दिवसाचे असते. अश्यावर जर पाळी वेळेत यावी असं वाटत असेल तर येथ आम्ही काही उपाय सांगत आहोत.

1 आलं 
आल्याचा चहा प्यायल्याने पाळी लवकर येते. पूर्वीच्या काळी बायका पाळी आणण्यासाठी आल्याचा वापर करत असे. हे उपयोगी असते.

2 हळद
दुधात हळद टाकून घेतल्यास पाळी लवकर येण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी आणि अजून ही पारंपरिक उपचार साठी हळदीचा वापर केला जातो. हळदी चे गुणधर्म औषधी असतात. हळद उष्ण प्रकृतीची असते. 
 
 
 
3 ओवा आणि गूळ 
ओवा आणि गुळाचे सेवन केल्याने मासिक पाळी लवकर येते. रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा आणि  गूळ टाका आणि ते पाणी सकाळी अनोश्यापोटी घ्या असे केल्याने पाळी लवकर येते.
 
4 कच्ची पपई
कच्ची पपई खाल्ल्याने किंवा कच्च्या पपईचा ज्यूस घेतल्याने मासिक पाळी नियमित आणि वेळेत येईल.
 
5 दूध- हळद
दुधात हळद टाकून काही आठवडे सेवन केल्याने देखील पाळी नियमित होते.
 
6 दालचिनी
एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकून काही आठवडे सेवन केल्याने पाळी नियमित होते.
 
7 बडीशेप 
एक ग्लास पाण्यात दोन चमचे बडीशेप मिसळून रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून प्या. हे नियमित केल्यास समस्या नाहीशी होईल.