बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जानेवारी 2020 (11:37 IST)

शौचावाटे रक्त पडणे, ही समस्या हलक्यात घेऊ नका

कधी कधी शौच्या वाटून रक्त येते. जेव्हा पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यामुळे शौचास त्रास होतो आणि जास्त जोर लावल्यावर शौच करण्यास त्रास होतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि रक्त येतं. हे सामान्य पण असू शकते. पण कधी  कधी शौचे मधून रक्त येणे हे गंभीर पण होऊ शकते. 
 
जास्त रक्त पडल्यास त्यांचा परिणाम आपल्या आरोग्यांवर होऊ शकतो. जास्त रक्त पडल्यास शरीरात रक्ताल्पता होऊ शकते.
 
कोणा व्यक्तीस मूळव्याध झाली असल्यास पण रक्त पडू शकते. फिशर, बद्धकोष्ठता, जंताचा त्रास, पोटात इन्फेक्शन, अल्सर, मोठ्या किंवा लहान आतड्यांमध्ये इन्फेक्शन झाले असल्यास, किंवा पोटाचे, गुदेचे, आतड्यांचे, मलाशयाचे कॅंसर असल्यास पण रक्त येऊ शकते. 
 
जर का बऱ्याच दिवसांपासून हा त्रास होत असेल, शौचेतून रक्त येत असेल तर अंगावर काढू नका. रक्त पडताना किंवा शौच क्रियेच्या वेळी पोट दुखत असल्यास, वजन वारं-वारं कमी होत असल्यास, जुलाब, उलट्यांचा त्रास होत असल्यास त्वरित  डॉक्टरला दाखवून वेळेत औषधोपचार घ्यावे. बद्धकोष्ठतेसाठी काही घरघुती उपाय 
पोट व्यवस्थित साफ होत नसेल त्यासाठी काही उपाय करावे ज्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही आणि पोट साफ होईल.
 
कांदा  
1 - 2 कांद्याच्या रसात साखर मिसळून दिवसातून 1 -2 वेळा हे रस प्यावे.
 
साजूक तूप
रात्री झोपण्यापूर्वी 1 कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून पाणी प्यावे.
 
लोणी आणि साखर
घरच्या ताज्या लोण्यात साखर घालून दिवसांतून 3 -4  वेळा खावे.
 
एरंडेल तेल
कणकेत 1 -2 चमचे एरंडेल तेल टाकून त्याची पोळी खाल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
 
त्रिफळा चूर्ण
दर रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यात हे चूर्ण घ्यावे. 
 
हे काही उपाय केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि शरीर स्वस्थ राहण्यास मदत मिळते. 
 
टीप :- तरही हे सर्व लक्षणे आढळ्यास लवकरात लवकर वैधकीय उपचार घ्यावे.