1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (15:08 IST)

Mammootty Sister Death: सुपरस्टार मामुटीवर दु:खाचा डोंगर

Mammootty Sister Death:साऊथचा सुपरस्टार म्हणून ज्यांची लोकप्रियता आहे त्या मामुटींचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही प्रचंड मोठा असल्याचे दिसून आले आहे. अशा या प्रसिद्ध अभिनेत्यावर आता दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 
 
मामुटी यांची बहिण अमीना यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय 70 वर्ष होते. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. अमीना या कंजिरापल्ली परयक्कल यांच्या परिवारातील दिवंगत पी एम सलीम यांच्या पत्नी होत्या. अमीना यांना नसीमा या नावानं देखील ओळखलं जात असे. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.