शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (14:38 IST)

मनोज वाजपेयी यांना मातृशोक

अभिनेता मनोज बाजपेयी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आई गीता देवी यांचे आज सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार मनोज बाजपेयी यांची आई दीर्घकाळापासून आजारी होती आणि त्यांची आई गीता देवी यांनी गुरुवारी वयाच्या 80 व्या वर्षी दिल्लीतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनोज बाजपेयी हे आपल्या आईच्या खूप जवळ होते. गेल्या वर्षीच या अभिनेत्याने वडिलांनाही गमावले होते. 3 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार मनोज बाजपेयी यांच्या आईची प्रकृती गेल्या 20 दिवसांपासून खूपच गंभीर होती. त्याच्या उपचारासाठी त्यांना दिल्लीतील पुष्पांजली मेडिकल सेंटर आणि मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मनोज बाजपेयी यांच्या आयुष्यातील त्या आधारस्तंभ होत्या. मनोज बाजपेयी व्यतिरिक्त त्यांना 2 मुले आणि 3 मुली आहेत. आईच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी ऐकून मनोज बाजपेयी यांनी त्यांना रुग्णालयात भेट दिली.
 
मनोज बाजपेयी नेहमीच आपल्या आई-वडिलांच्या खूप जवळचे राहिले आहेत. प्रसारमाध्यमांशी खास संवाद साधतानाही ते अनेकवेळा त्याच्या आईने सांगितलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करताना दिसलेले आहे.