1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जुलै 2020 (11:45 IST)

विकासची भूमिका साकारणार मनोज?

Manoj
उत्तर प्रदेशातील कुख्यात विकास दुबे याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला आहे. यामध्ये दुबे याचा  मृत्यू झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवण्याबाबत विचार करु लागले आहेत. प्रोड्यूसर संदीप कपूर यांनी टि्वट करत असे म्हटले आहे की, विकास दुबे याच्या एन्काउंटरसंबंधित चित्रपट बनवल्यास त्यामध्ये अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिका साकारु शकतो. तसेच याबाबत आता बॉलिवूडमध्ये चर्चा सुरु झाली आहे. 
 
विकास दुबे याचा एन्काउंटर करण्यात आल्यानंतर हे प्रकरण विविध अँगलच्या माध्यमातून पाहिले जात आहे. दुबे याचा एन्काउंटर हा एखाद्या नाट्याचा भाग असल्याचे दिसून आले. तर संदीप कौर याने टि्वट करत म्हटले आहे की, मनोज वाजपेयी जर तू विकास दुबेची भूमिका साकारली तर कसे वाटेल? तू तर कमालच करशील. मनोजने ही चुकीची बातमी असल्याचे ट्विट करत स्पष्ट केले आहे. कपूर याचा भोसले चित्रपट ज्यामधून मनोज झळकला आहे. तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे.