सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 27 मे 2020 (12:22 IST)

Whatsapp वरून बुक करा सिलिंडर

भारत पेट्रोलियम कोर्पोरेश लिमिटेड ने ग्राहकांना दिलासा दिला आहे. कंपनीकडून मोठी घोषणा करण्यात आली असून आता देशभरात घरबसल्या आपल्याला सिलिंडर बुक करता येणार आहे. Whatsapp द्वारे आपण घरबसल्या सिलिंडर बुक करू शकता. 
 
देशभरातील भारत गॅस ग्राहक व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून कुठूनही सिलिंडर बुक करू शकतात अशी घोषणा करण्यात आली आहे. देशात 7.10 कोटी एलपीजी ग्राहक आहेत. 
 
सिलिंडर बुक करण्याची प्रक्रिया जाणून घ्या 
कंपनीकडून BPCL स्मार्टलाइन नंबर देण्यात आला आहे. Whatsappवरून 1800224344 या नंबरवर बुकिंगसाठी मेसेज करता येईल.
 
whatsapp वरून बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना एक मेसेज येईल. ज्यात एक लिंक मिळेल. या लिंकवर क्लिक करुन ग्राहकांना आपली पेमेंट प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. याद्वारे ऑनलाईन पेमेंट करण्यात येईल.