शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 25 मे 2020 (08:28 IST)

मर्यादित स्वरूपात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

केंद्र सरकारनं मर्यादित स्वरूपात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, आज पासून २५ मे देशातंर्गत प्रवासी विमान वाहतुकीला सुरूवात होत आहे. केंद्राच्या निर्णयानंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचं लक्ष होतं. अखेर राज्य सरकारनं मुंबई विमानतळावरून विमान वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून दररोज २५ विमान उतरणार असून, तितकेच उड्डाण करणार आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.
 
चौथ्या लॉकडाउनची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातून अनेक सेवा आणि व्यवहारांना शिथिलता देण्यात येईल अशी घोषणा केली. नंतर एनडीआरएफनं याविषयीची नियमावली जारी केली होती. यात विमानसेवा बंद राहिल, असं म्हटलं होतं.  सरकारनं निर्णयात फेरबदल करत मर्यादित स्वरूपात देशातंर्गत विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
 
राज्य सरकारनं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात मर्यादित स्वरूपात प्रवासी विमान उड्डाण करणार आहेत. त्यानंतर हळूहळू त्यात वाढ केली जाणार आहे. याविषयी बोलताना राज्याचे मंत्री नवाब मलिक म्हणाले,”मुंबई विमानतळावरून देशातंर्गत विमान वाहतूक करण्यास सरकारनं संमती दिली आहे. मुंबई विमानतळावर दररोज २५ विमान उतरणार आहेत. त्याचबरोबर २५ विमान उड्डाण करतील. विमान फेऱ्यांची संख्या हळूहळू वाढवली जाईल. यासंदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जारी करण्यात येईल,” अशी माहिती मलिक यांनी दिली.