कोरोना कमिशनची लूट सुरु आहे, सोमय्या यांचा आरोप
मुंबईत पॉझिटिव्ह रुग्ण आढळणाऱ्या परिसरातील लोकांना तात्काळ संस्थात्मक क्वारंटाईन केले जाते. तिथे क्वारंटाईन केलेल्या लोकांना दोन वेळचे जेवण, नाश्ता आणि चहा देण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र मुंबईत वेगवेगळ्या क्वारंटाईन सेंटरमध्ये कंत्राटदाराला वेगवेगळे दर दिलेले आहेत. तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये दिले जाणारे अन्नही निकृष्ट दर्जाचे असल्याचे तेथील लोक सागंत आहेत. महाविकास आघाडीतील मंत्री क्वारंटाईनचे कंत्राट मिळवण्यासाठी स्पर्धा करत असून कोरोना कमिशनची लूट होत असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सौमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी मुंबईतील विविध ठिकाणच्या क्वारंटाईन सेंटरला जाऊन भेट दिली. वेगवेगळ्या क्वारनंटाईन सेंटरमध्ये कंत्राटदाराला वेगवेगळे जेवणाचे दर दिले असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्व उपनगरात दिवसाचे प्रती व्यक्ती प्रती दिन १७२ रु, धारावी दादरमध्ये ३७२ रु, ठाण्यात ४१५ रुपयांचे कंत्राद दिलेले आहे. एवढे महागडे कंत्राट देऊन सुद्धा जेवणाचा दर्जा अतिशय खराब असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.