बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2020-21
Written By

संसदेचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, उद्या अर्थसंकल्प सादर होणार

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास शुक्रवारपासून सुरुवात होत असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी सरकारकडून विरोधी पक्षांना करण्यात आले. नागरिकत्व विधेयक, आर्थिक मंदीसह इतर मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी केलेला आहे.
 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाद्वारे अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होईल. अभिभाषणानंतर सरकारकडून संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल. देशाच्या आर्थिक विकासाचा लेखाजोखा आर्थिक पाहणी अहवालाद्वारे मांडला जातो. अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्‍लागार आणि त्यांचे सहकारी आर्थिक पाहणी अहवाल तयार करीत असतात. यावेळचा अहवाल मुख्य आर्थिक सल्‍लागार के. सुब्रह्मण्यम यांनी तयार केलेला आहे.