गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 मे 2020 (12:06 IST)

मिलिंद सोमणने पुन्हा शेअर केला वादग्रस्त न्यूड फोटो

Madhu Sapre
मिलिंद सोमण हे नाव घेतल्यासोबतच फिटनेस फ्रिक सुपर मॉडल असं चित्र डोळ्यासमोर येतं आणि आठवतो 25 वर्षांपूर्वीचा काळ जेव्हा आपल्या न्यूड फोटोमुळे मिलिंद सोमण आणि मधु सप्रे यांना वादविवादाला सामोरं जावं लागलं होतं. मधू सप्रेसोबतचा तो फोटो मिलिंदने पुन्हा सोशल मीडियावर शेअर केला आहे.
 
त्यावेळी वादाचं कारण ठरलेला हा फोटो शेअर करत मिलिंद सोमणने लिहिलं, ‘माझ्या टाइमलाइनवर अधून-मधून या फोटोचं पॉप-अप दिसत असतं. हा फोटो २५ वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी इंटरनेट आणि सोशल मीडिया हे काहीच नव्हतं. आता विचार करतोय की जर हा फोटो आताच्या घडीला प्रदर्शित झाला असता तर लोकांचं प्रतिसाद काय मिळाला असता.’