सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2019 (10:23 IST)

मोदींच्याच नावाचा फायदा चित्रपटाला नाही

अनेक वाद-विवादानंतर अखेर 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने २.५० कोटींचा आकडा पार केला आहे. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये देशभरातील जनतेने मोदींनाच पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. 
 
देशभरातून मोदींच्याच नावाची चर्चा असताना चित्रपटाला मात्र याचा फायदा होताना दिसत नाही. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी 'पीएम नरेंद्र मोदी'ने पहिल्या दिवशी २.८८ कोटींची कमाई केल्याचं म्हटलंय. चित्रपटाच्या सकाळच्या शोसाठी प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होता. परंतु संध्याकाळनंतर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.