बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (08:29 IST)

ज्येष्ठ अभिनेत्री नफिसा अली यांनी कॅन्सर

ज्येष्ठ अभिनेत्री नफिसा अली यांनी कॅन्सर झाला असून त्यांना तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर असल्याचं त्यांनी स्वत: सोशल मीडियावर सांगितलं आहे. नफिसा यांनी इन्स्टाग्रामवर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत कॅन्सर झाल्याची माहिती दिली.‘माझा कॅन्सर तिसऱ्या स्टेजचा असून या कठीण प्रसंगातून सामोरं जाण्याचं धैर्य मला माझ्या मैत्रिणीकडून मिळालं आहे. तिनेच मला हा लढा देण्यासाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत’, असं नफिसा यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
नफिसा यांना कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चौकशी करत त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे.