बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

नीना गुप्ता वयाच्या 59 व्या वर्षी गर्भवती, बधाई हो!

अभिनेत्री नीना गुप्ता वयाच्या 59 वर्षी प्रेग्नेंट आहे. यात हैराण होण्यासारखे काही कारण नाही कारण नीना रिअल नव्हे तर रील लाइफमध्ये गर्भवती आहे.
 
19 ऑक्टोबर रोजी नीनाची बधाई हो नावाचा सिनेमा रिलीज होणार आहे. यात नीनाने तरुण मुलांच्या आईची भूमिका साकारली असून त्यात ती गर्भवती असल्याचे दर्शवले आहे. यामुळे कुटुंबातील लोकं आणि समाज यांना ती कशप्रकारे सामोरा जाते दाखवण्यात आले आहे. 
 
नीनाने स्क्रिप्ट न ऐकताच होकार दिला होता. तिच्याप्रमाणे सब्जेक्ट इतका उत्तम आहे आणि स्क्रिप्ट ऐकण्याची गरजच भासली नाही.
 
नीनाच्या हिशोबाने या वयात हव्या तश्या चांगल्या भूमिका मिळत नाही म्हणून इतकी दमदार भूमिकेला नाकारण्याचे कारणच नव्हते. या सिनेमात आयुष्यमान खुराना नीनाच्या मुलाच्या भूमिकेत आहे.