मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 12 सप्टेंबर 2018 (11:08 IST)

न्यूज़प्रिंटमध्ये सर्वाधिक अक्षय कुमारची चर्चा

Akshay Kumar
स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टच्या अनुसार, न्यूज़प्रिंटमध्ये सर्वाधिक चर्चिला गेलेला आणि लोकप्रिय असलेला सेलिब्रिटी अक्षय कुमार ठरला आहे.  गोल्ड सिनेमाच्या रिलीजच्यावेळी अक्षय कुमार 14 भारतीय भाषामधल्या मुख्य 125 वर्तमानपत्रांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.
 
ह्या आकडेवारीनूसरा, अक्षय 87 गुणांसह न्यूजप्रिंट श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर राहिला. तर अमिताभ बच्चन 82 गुणांसह दूस-या स्थानावर आणि  सलमान खान 71 गुणांसह तिस-या स्थानावर राहिले. अभिनेता ऋषि कपूर चौथ्या स्थानी तर युवापिढीचा लाडका वरुण धवन पाचव्या स्थानी होता. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “अक्षयच्या गोल्ड सिनेमाच्या रिलीजनंतरही अक्षय आपल्या सामाजिक कार्यामूळे सतत चर्चेत होता. वर्तमानपत्रात त्याच्या फॅमिली हॉलिडेपासून ते सिनेमांच्या रिलीज आणि आणि फिटनेसबद्दल जे काही लिहून आले त्यामूळे तो सर्वाधिक चर्चिला गेलेला बॉलीवूड स्टार ठरला” आहे.