शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018 (16:24 IST)

‘फोर्ब्स’ची यादी : अक्षयकुमार, सलमान सर्वाधिक कमाई करणारे अभिनेते

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या नावाची यादीत टॉप १० अभिनेत्यांमध्ये अक्षयकुमार आणि सलमान खान यांनी बाजी मारली आहे. वर्षभरामध्ये अक्षय आणि सलमानने केलेल्या दमदार चित्रपटामुळे त्यांच्या कमाईमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे वर्षभरामध्ये २८३ कोटी रुपयांची कमाई करुन अक्षयने या यादीत सातवं स्थान पटकावलं आहे. तर सलमाननेही २६९ कोटी रुपयांची कमाई करत नववं स्थान पटकावलं आहे.
 
फोर्ब्सची ही यादी सेलिब्रेटींचे वर्षभरातील उत्पन्न आणि त्यांची प्रसिद्धी यावरून तयार करण्यात येते. यंदा २०१८ च्या जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये हॉलिवूड अभिनेता जॉर्ज क्लूनी यांनी अव्वल स्थान मिळविलं आहे.
 
दरम्यान, टॉप १० मध्ये जॉर्ज क्लूनी (१ हजार ६७२ कोटी रुपये), ड्वेन जॉन्सन (८६७ कोटी रुपये), रॉबर्ट डाउनी जूनियर (५६६ कोटी रुपये), क्रिस हेम्सवर्थ (४५१ कोटी रुपये), जॅकी चॅन(३१८ कोटी रुपये), विल स्मिथ (२९३ कोटी रुपये), अक्षय कुमार( २८३ कोटी रुपये) अॅडम सँडलर (२७६ कोटी रुपये ), सलमान खान (२६९ कोटी रुपये) ,क्रिस इवान्स (२३७ कोटी रुपये) या अभिनेत्यांचा समावेश आहे.