मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 10 सप्टेंबर 2018 (15:18 IST)

अक्षय कुमारकडून 'पळशीची पी.टी.' चे कौतुक

akshay kumar
फ्रान्समध्ये होणा-या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून 'पळशीची पी.टी.' या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. हा सिनेमा मुळचा साता-यातील पळशी गावातला आहे. योगायोगाने त्याच दरम्यान साता-यामध्ये अभिनेते अक्षय कुमार त्यांच्या आगामी हिंदी 'केसरी' चित्रपटाचे शूट करत होते. 'पळशीची पी.टी.' चे कौतुक त्यांच्याही कानावर पडले आणि कुतुहल म्हणून काय आहे 'पळशीची पी.टी.' हे जाणून घेण्यासाठी अक्षय कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते धोंडिबा कारंडे यांना 'केसरी'च्या सेटवर बोलवून त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर 'पळशीची पी.टी.' ची कथा आणि सर्वांनी मिळून या चित्रपटाला एक कलाकृती म्हणून कसं तयार केलं, त्यासाठी घेतलेली मेहनत जाणून घेतल्यावर अक्षय कुमार यांनी देखील 'पळशीची पी.टी.'चे मनापासून कौतुक केले आणि चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.