बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जुलै 2020 (11:47 IST)

एक पोस्ट करण्याचे घेते 2 कोटी

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इन्स्टाग्रामची कोट्यवधींची कमाई करणार सेलिब्रिटींची यादी जाहीर झाली. या यादीत एकाच बॉलिवूड स्टारचे नाव आहे ते म्हणजे सुपरस्टार प्रियंका चोप्रा. यासोबतच या यादीत समाविष्ट होणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री झाली. इन्स्टाग्रामच्या शेड्युलिंग टूल HopperHQ ने ही यादी शेअर केली आहे. या यादीनुसार, प्रियंका चोप्रा यात 28 व्या स्थानावर आहे. प्रियंका तिच्या प्रत्येक पोस्टमधून कोट्यवधींची कमाई करते. देसी गर्ल एक पोस्टचे जवळपास 2 कोटी 16 लाख रुपये घेते. गेल्यावर्षी प्रियंका या यादीत 19 व्या स्थानावर होती. प्रियंकाशिवाय या यादीत भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीही आहे.
 
विराट या यादीत प्रियंकाच्या दोन स्थानावर म्हणजे 26 व्या स्थानावर आहे.विराट एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करण्यासाठी अंदाजे 2 कोटी 21 लाख रुपये घेत असल्याचे म्हटले जाते. या यादीत प्रियंका आणि विराट हे दोनच भारतीय सेलिब्रिटी आहेत. या यादीत अग्रणी अभिनेता ड्‌वेन जॉनसनचे नाव आहे. क्रिस्टियानो एरियाना ग्रांडे, बियॉन्से  नोल्स, जस्टिन बीबर, टेलर स्विफ्ट यांच्या नावाचाही समावेश आहे.