मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (14:57 IST)

सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपये - अजित पवार

सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपये जाहीर केल्याचं उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.
 
सध्याची राज्याची परिस्थिची बिकट असली, तरी जिथं पैसा द्यायचा बाकी आहे, तिथं तो द्यावा लागतो, असंही त्यांनी म्हटलंय.
 
सारथी संस्थेची स्वायत्तता राखणं गरजेचं आहे. आज सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपये दिले ही चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिली आहे.
 
सारथी संस्था बंद होणार नाही, आता निधी मिळाल्यामुळे ती वेगानं काम करेल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.