बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'पलटन' 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार

'Paltan' to release on September 7
दिग्दर्शक जे.पी. दत्ता 'पलटन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाची कथा भारत व चीन युद्धावर आधारीत आहे. हा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचे खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी ११ सप्टेंबरला सिक्कीम सीमेवर भारत-चीन युद्ध सुरू झाले होते. त्याच आठवड्यात 7 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
टीझरमध्ये जे.पी. दत्ता यांच्या बॉर्डर व एलओसी या सिनेमांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात बर्फाळ पर्वत सर करत असताना सैनिक वंदे मातरमचे नारे देताना दिसत आहेत. सत्य घटनेवर आधारीत असलेल्या या चित्रपटात सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल, सोनू सूद, गुरमीत चौधरी, हर्षवर्धन राणे, सिद्धार्थ कपूर, लव सिन्हा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दीपिका कक्कर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री ईशा गुप्तादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.