शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (19:14 IST)

OMG 2 मध्ये दिसणार पंकज त्रिपाठी

परेश रावल आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल साकारला जाणार आहे. येत्या काही दिवसात अभिेनेता अक्षय कुमार या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहे. मात्र या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये परेश रावलऐवजी पंकज त्रिपाठी दिसणार आहे. विशेष म्हणजे ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाच्या सिक्वेलची निर्मिती उमेश शुक्लांऐवजी अमित राय करणार आहे.