गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (17:03 IST)

प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन, मुलीने दिली माहिती

Pankaj Udhas passes away: प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे वयाच्या ७२ वर्षी निधन झाल्याची बातमी आहे. पद्मश्री पंकज उधास यांची कन्या नायब उधास यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पंकज उधास हे अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त होते.
 
त्यांच्या निधनाची माहिती त्यांची कन्या नायब उधास यांनी दिली आहे. आज सकाळी अकार वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या मुलीने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, "अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला कळवावे लागते की, पद्मश्री पंकज उधास जी यांचे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले." मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
 
पंकज उधास हे गुजरातचे होते. तीन भावांमध्ये ते सर्वात लहान होते. त्यांचे इतर दोन भाऊही गायक आहेत. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘चिठ्ठी आयी है’ या गझलनंतर त्यांची कीर्ती चांगलीच वाढली. त्यांना दोन मुली आहेत. एका मुलीचे नाव नायब आणि दुसऱ्या मुलीचे नाव रेवा असे आहे.