1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. people-destroyed-padmavatis-rangoli-made-by-an-artist-in-surat-gujarat

सुरत: ‘पद्मावती’ची रांगोळी पुसून टाकली

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाला राजपूत करनी सेनेचा विरोध कायम आहे. सुरतमधील राहुल राज मॉलमध्ये काढण्यात आलेली ‘पद्मावती’ची रांगोळी पुसून टाकत करनी सेनेने जोरदार गोंधळ केला.

करनी सेनेने ज्या रांगोळीची नासधूस केली, ती रांगोळी काढण्यासाठी 48 तास लागले होते. कलाकाराने 48 तास एका जागेवर बसून ही रांगोळी काढली होती. त्यामुळे ही नासधूस पाहून सिनेमात पद्मावतीची भूमिका साकरत असलेल्या दीपिका पदुकोणचा संताप अनावर झाला.हे कुठे तरी थांबायला हवं आणि अशा कायदा हातात घेणाऱ्या लोकांवर तातडीने कारवाई व्हायला हवी, अशी मागणी दीपिकाने माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केली.

पुढील लेख
शेराने बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप, गुन्हा दाखल