1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (10:50 IST)

रणवीरसिंग अभिनित '83' चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, रणवीर सिंगला पाहून लोक थक्क झाले

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या '83' चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे. ते पाहिल्यानंतर आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याला पाहिल्यानंतर लोकही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येकजण त्याची स्तुती करताना थकत नाही. ट्रेलर खरोखरच धक्कादायक आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकांच्या मनात चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ट्रेलरमध्ये रणवीर सिंग हुबेहूब कपिल देवसारखे दिसत आहे. 
रणवीर सिंगने '83' चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारली आहे.दीपिका पादुकोण यांनी कपिल देव यांच्या पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारली आहे.  या व्यक्तिरेखेला त्यांनी आपल्या अभिनयाने जिवंत केले आहे. अभिनेत्याच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र केले जात आहे.या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. या व्यतिरिक्त ताहीर राज भसीन, जीव साकिब सलीम, जतीन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी हे कलाकार देखील असणार. रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फँटम फिल्म्स ची कबीर खान फिल्म प्रॉडक्शनचा हा चित्रपट  83 हा भारताच्या 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघावर आधारित आहे.