मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जुलै 2020 (16:41 IST)

'प्रभास 20' चे निर्माते येत्या 10 जुलैला सादर करणार चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर!

पॅन इंडिया स्टार प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता प्रभासाच्या असंख्य चाहत्यांना आहे. ही उत्सुकता अधिक न ताणता प्रभासच्या आगामी चित्रपट निर्मात्यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
 
निर्मात्यांनी आपल्या सोशल मिडीयावर नुकतेच एक पोस्टर प्रदर्शित केले असून त्यामध्ये 10 जुलै 2020 ला चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. या पोस्टरच्या मधोमध एक घड्याळ असून त्यावर 'फर्स्ट लुक' असे लिहिलेले आहे आणि ते घड्याळाचा काटा 10 वाजल्याचे दाखवत आहे, ज्यातून हे सुचीत होते आहे कि 'प्रभास 20’ चे फर्स्ट लुक पोस्टर १० तारखेला सकाळी 10 वाजता प्रदर्शित होणार आहे.
 
या चित्रपटात पूजा हेगडे, भाग्यश्री, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर आणि सथ्यन अशा मोठ्या कलाकारांची फौज दिसणार आहे. ‘प्रभास 20’ राधा कृष्ण कुमार द्वारे दिग्दर्शित असून कोटागिरी वेंकटेश्वर राव यांनी चित्रपटाच्या एडिटिंगची धुरा सांभाळली आहे. सिनेमैटोग्राफी मनोज परमहंस यांची असून चित्रपटाचे प्रोडक्शन डिजाइन आर रवींद्र यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांनी टी-सीरीजसोबत यूवी क्रिएशन्सचे वामसी प्रमोद यांच्यासोबत मिळून केली आहे.