सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 17 मे 2023 (19:11 IST)

Prathmesh Parab: प्रथमेश परबच्या नव्या हिंदी चित्रपटाचा मुहुर्त संपन्न

prathames parab
*प्रथमेश परबच्या नव्या चित्रपटाचा मुहुर्त संपन्न*
मराठीचा प्रसिद्ध अभिनेता प्रथमेश परब लवकरच आपल्या चाहत्यांसाठी एक नवा कोरा सिनेमा घेऊन येत आहे.  मदर्स डे च्या दिवशी प्रथमेश ने आपल्या आगामी चित्रपटाबद्दल सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. मातृदिनाच्या मुहूर्तावर त्याच्या या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. हा चित्रपट आई आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रथमेशला आतापर्यंत आपण रॉम कॉम आणि युवा पिढीवर आधारित चित्रपटात काम करताना पाहिले आहे. मात्र हा चित्रपट त्याने यापूर्वी साकारलेल्या सर्व भूमिकांना छेद देणारा असणार आहे.  
तूर्तास, या चित्रपटाबद्दल अधिक माहिती हातात आली नसली तरी प्रथमेश ने टाकलेली पोस्ट सर्व काही बोलून जाते.
प्रथमेश लिहिले की, "एक नवीन सुरुवात. खूप सुंदर विषय, आणि मातृदिन सोबत या सिनेमाचे खूप गोड नातं आहे." प्रथमेश ने दिलेल्या या कॅप्शन मुळे हा चित्रपट एका वेगळ्याच धाटणीचा असणार आहे, यात वाद नाही. शिवाय प्रथमेश देखील एका वेगळ्या रूपात या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.   
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती डेविड नाडर यांच्या प्रोडक्शन वन ही संस्था करणार असून, मोहसीन खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.