गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By
Last Updated : रविवार, 14 मे 2023 (10:01 IST)

Mother’s Day2023 Wishes In Marathi मदर्स डे शुभेच्छा

* ती आहे म्हणून सारे विश्व आहे, 
ती आई म्हणूनच मी आहे
ती आहे म्हणूनच ही सुंदर नाती आहेत
आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
* आई म्हणजे स्वर्ग
आई म्हणजे सर्व काही
कितीही जन्म घेतले तरी
तुझे ऋण फेडू शकणार नाही
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* हजार जन्म घेतले तरी 
एका जन्माचेही ऋण फिटणार नाही 
आई लाख चुका होतील माझ्याकडून
पण तुझं समजावणं कधीच मिटणार नाही 
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* दोन शब्दात सारं आकाश सामावून घेई 
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई 
आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* दुःखाचा डोंगर असो की सुखाची बरसात 
आठवते ती एकच व्यक्ती कायम जिचा हवा सहवास...
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* जगी माऊलीसारखे कोण आहे 
तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे
असे हे ऋण ज्याचे व्याज नाही 
या ऋणाविना जीवनास साज नाही 
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही 
कितीही कामात असली माझ्याशी बोलणे विसरत नाही
कितीही चिडलो तिच्यावर तरी ती मात्र माझ्यावर चिडत नाही
म्हणून तर आई मला तुला सोडून कुठेच जावेसे वाटत नाही 
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* उन्हामधली सावली तू
पावसातली छत्री तू 
हिवाळ्यातली शाल तू 
माझ्यासाठी आहेस सर्वकाही तूच 
आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* हंबरूनी वासराला जेव्हा चाटते गाय 
तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसते माझी माय 
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* माझ्या हृदयात एकाच व्यक्तीला अढळ स्थान
आणि ती म्हणजे तू आहेस माझी आई महान
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला
आई मी भाग्यवान आहे की, मी तुझ्या पोटी जन्माला आला
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* पूर्वजन्माची पुण्याई असावी जो जन्म तुझ्या पोटी घेतला
जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
आई मातृदिनाच्या शुभेच्छा!
 
* सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तर तू आहेसच
पण तू माझी आहेस याचा मला अभिमान आहे
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* माझ्यासाठी जिच्या ओठावर फक्त असतो आशिर्वाद
अशा आईला माझा शत-शत नमस्कार 
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* जगात अशी कोणती गोष्ट आहे जी मिळत नाही
बाकी सर्व मिळू शकतं पण आई कधीच मागून मिळत नाही 
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
 
 * आई पेक्षा लहान शब्द असेल तर सांगा,
आईपेक्षा मोठा कोणी असेल तर सांगा.
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* लोक म्हणतात आज मातृदिन आहे,
असा  कोणता  दिवस आहे जो आई शिवाय आहे .
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* मरण्याचे अनेक मार्ग आहेत
पण जन्म घेण्यासाठी फक्त आई असते.
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* लक्ष दूर आणि प्रवास लांब आहे 
आईला माझ्या आयुष्याची खूप काळजी आहे.
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* जर औषध काम करत नसेल तर ती दृष्ट काढते.
एकच आई आहे जी कधीही हार मानत नाही.
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* मी स्वर्गाचा प्रत्येक क्षण पाहिला होता,
जेव्हा आईने मला कडेवर घेऊन माझ्यावर प्रेम केले.
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* मित्रांनो, माझ्या आईला कसे मोजायचे ते माहित नाही.
मी एक पोळी मागितली तर ती दोन आणते.
अशा माझ्या आईला 
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
* जेव्हा मी तुझ्याबद्दल लिहितो आई,
नकळत का माझे डोळे भरून येतात.
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
 
 



Edited by - Priya Dixit