बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By

मदर्स डे च्या शुभेच्छा मराठी Mother's Day 2023 Wishes In Marathi

mothers day wishes
आई ही एकच अशी व्यक्ती आहे 
जी इतरांपेक्षा नऊ महिने अधिक तुम्हाला ओळखत असते 
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई 
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे
आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते
डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते 
डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते
मातृदिन शुभेच्छा
 
आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा
पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका
मातृदिन शुभेच्छा
 
आईची ही वेडी माया
लावी वेड जीवा 
जन्मोजन्मी तुझाच मी व्हावा 
माझ्या आयुष्यभराचा हाच खरा ठेवा 
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
हीच इच्छा माझी की, कितीही वेळा होईल
जन्म माझा, तूच हवीस कारण तू आहेस
माझा जन्मोजन्मीचा ठेवा.
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
ज्या माऊलीने दिला मला जन्म
जिने गायली अंगाई
आज मातृदिनाच्या दिवशी 
नमन करतो तुजला आई
 
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस 
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी 
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
उन्हामधली सावली तूच
पावसातली छत्री तूच
हिवाळ्यातली शाल तूच 
माझ्यासाठी आहेस सर्वकाही तूच
मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
 
हंबरूनी वासराला जेव्हा चाटते गाय 
तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसते माझी माय
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आई आमची सर्वप्रथम गुरु,
तुझ्याचपासून माझे अस्तित्व सुरु,
मातृदिनाच्या शुभेच्छा!