रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मे 2023 (18:00 IST)

Mother's Day 2023 - दीपस्तंभ होती तू जीवनाचा

mothers day
महिना सरला निरोप देऊनी आई तुजला
अश्रूंचा ओघ ना अजून थांबला
काळ घेऊनी गेला तुला
रिता हात राहीला माझा
 
डोळे मिटता ही आठवतो 
चेहरा तुझा जातानाचा
आई ,आई, म्हणत राहीले
निघून गेली तू नीजधामाला
 
आठवणींचा ना विसर पडला
अनवरत लाटा भिंडती र्हदयाला
दीपस्तंभ होती तू जीवनाचा
आधाराचा भक्कम पाया
 
अगणित यातना सोसल्या
आपल्या मुलांना घडवताना
लहानपणापासून आठवते
फक्त तुझी कष्टाळू काया
 
काय अरुणोदय, काय सूर्यास्त
जणू माहीतच नव्हते तुजला
ध्येयपूर्ती साठी झटत होती
प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती
ना खचली, ना डगमगली,
स्वाभीमान जपत, अभिमान राखत
मोडका संसार सावरत
मदत केली सर्वांना
ना निराश जीवनी झाली
ना घाबरली मरणाला
तुझी निडर, कर्तव्य दक्ष
छवी राहील मनात माझ्या
रिती जागा रितीच  राहील
आई म्हणून साद घालू कुणाला
जन्मोजन्मी तुझीच कूस लाभो
हीच प्रार्थना देवाला
सुखकर असो नव प्रवास तुझा
लाभो नव नात्यांच्या गोडवा
सौख्य तुला अखंड लाभो
ईश्वर चरणी हीच प्रार्थना. 
 
तुझी विद्या