सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2019 (10:37 IST)

वेब सीरिजपेक्षाही जास्त प्रियाचा सर्च

अभिनेत्री प्रिया बापटची वेब सीरिज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. अभिनेत्री गीतिका त्यागीसोबतचा प्रियाचा बोल्ड सीन असून याबद्दल तिला ट्रोलही केलं जातंय. पण गुगलवर तिला तितकंच सर्चसुद्धा केलं जातंय. आश्चर्याची बाब म्हणजे, त्या एका बोल्ड सीनमुळे प्रिया बापटचा दक्षिण भारतातील गुगल सर्च वाढला आहे.
 
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजपेक्षाही जास्त प्रियाला सर्च केलं जातंय. ‘गुगल ट्रेण्ड’नुसार ३ मेपासून प्रिया बापटचा सर्च वाढला आहे. प्रिया बापटला गोवा, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षाही अधिक सर्च केलं गेलं आहे.