मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2019 (14:33 IST)

किक 2 मध्ये जॅकलीनच्या जागेवर दीपिका पादुकोण असेल सलमान खानची नायिका

सलमान खान आणि दीपिका पादुकोणची जोडी बनता बनता राहूनच जाते. बर्‍याच वेळा फिल्म डायरेक्टर्सने दोघांना सोबत आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण ते काही जमलं नाही. दीपिकाने तर बर्‍याच वेळेस सांगितले आहे की तिला सलमान सोबत एक चित्रपट करायचा आहे. पण अद्याप तिची ही इच्छा अधुरीच राहिली आहे.
 
सलमान बरोबर चित्रपट 'किक'मध्ये पहिली चॉइस दीपिकाच होती, पण हे चित्रपट तिच्या हातून निघून जॅक्लीनला मिळाले आहे.
 
किक 2 चे सीक्वल अनाउंस होऊन बराच वेळ निघून गेला आहे. चित्रपटाची रिलीज डेट देखील आली आहे, पण अद्याप न तर शूटिंग सुरू झाली ना नायिका कोण आहे हे कळले आहे.
 
सलमान या वेळेस भारतच्या प्रमोशनात व्यस्त आहे. दबंग 3ची शूटिंग करत आहे. यातून वेळ मिळाल्याबरोबरच तो किक 2 सुरू करेल. या दरम्यान नायिकांबद्दल बरीच चर्चा सुरू आहे.
सोर्सेसचे ऐकेले तर जॅक्लीनला किक 2 पासून आऊट करण्यात आले आहे आणि तिच्या जागेवर दीपिका पादुकोणला घेण्यात येत आहे.
 
चित्रपटाचे प्रोड्यूसर साजिद नाडियाडवाला पहिल्यांदा सलमान-दीपिकाची जोडी बिग स्क्रीनवर सादर करण्याचा श्रेय घेण्यास इच्छुक आहे.
सलमानच्या चित्रपटात हिरॉईनला काही खास स्कोप नसतो आणि दीपिका असा रोल तर करणारच नाही. म्हणून दीपिकाचा रोल देखील पॉवरफुल बनवण्यात येत आहे ज्याने दीपिका चित्रपटासाठी हो म्हणेल.
 
जर हे शक्य झाले तर दीपिका-सलमानाची  फ्रेश पेयर किक 2 मध्ये बघायला मिळेल.