रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आता प्रिया वारियरचा होळीचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर फेमस झालेली प्रिया प्रकाश वारियरचा होळीचा व्हिडिओ समोर आला असून तो ही व्हायरल व्हायला सुरूवात झाली आहे. या व्हिडिओत प्रिया होळी खेळताना दिसत आहे. यात तिचा सिनेमातील सहकलाकार रोशन अब्दुल रऊफ देखील दिसत आहे. प्रियाने हा व्हिडिओ स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात प्रिया आणि अब्दुल हातात गुलाल घेऊन एकमेकांना रंगवताना दिसत आहेत.

 

यापूर्वी श्रीदेवी यांच्या निधनानंतर तिने त्यांच्या आठवणीत एक खास व्हिडिओ शेअर केला होता. प्रियाचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या. मात्र याचे उत्तर देण्यासाठी तिने एक खास पोस्ट केली. त्यात प्रिया म्हणते, मी अजूनही माझ्या पहिल्या सिनेमाचे शूटिगं पूर्ण केलेले नाही. त्यामुळे सध्यातरी दुसऱ्या कोणत्याही सिनेमाचा भाग होऊ शकत नाही. त्याचबरोबर दिग्दर्शकांनी माझ्या सारख्या इतर नव्या चेहऱ्यांनाही संधी द्यायला हवी आणि त्यांचे ऑडीशन घ्यायला हवे, असे ती मोठ्या मनाने सांगते.