शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 2 डिसेंबर 2020 (13:24 IST)

प्रियंकाने सांगितले बेडरूम सिक्रेट

बॉलिवूडमधल्या ‘देसी गर्ल'सोबत म्हणजेच प्रियंका चोप्रासोबत तीन वेळा डेटवर गेल्यानंतर निक जोनासने तिच्या आईला फोन करून सांगितले की, मला माझी जोडीदार मिळाली. त्या घटनेच्या दोन महिन्यातच ग्रीसमध्ये असताना निकने प्रियंकाला लग्रासाठी प्रपोज केले. 1 डिसेंबर 2018 मध्ये या दोघांनी शाही विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधली. प्रियंका-निकच्या लग्राला दोन वर्षे पूर्ण झाली असून प्रियंकाने अनेक मुलाखतींमध्ये निक व त्याच्या कुटुंबीयांविषयी बर्यायच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या. गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत प्रियंकाने बेडरुम सिक्रेट सांगितले. 
 
या मुलाखतीत ती म्हणाली होती, हे खरंच खूप त्रासदायक आहे, पण रोज सकाळी उठल्यावर निक माझा चेहरा सर्वांतआधी पाहण्याचा आग्रह धरतो. झोपेतून उठल्यावर किमान मला तोंड धुवू दे किंवा एखादा मॉइश्चराइजर तरी लावू दे असे माझे म्हणणे असते. पण ही तितकीच गोड गोष्ट आहे. आपल्या पतीने सकाळी उठल्यावर सर्वांत आधी आपला चेहरा पाहावा अशी अनेकांची इच्छा असते. डिसेंबर 2018 मध्ये जोधपूरमध्ये प्रियंका-निकचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्रसोहळला दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळी उपस्थित होते. ‘मेट गाला'च्या इव्हेंटमध्ये निक आणि प्रियंका पहिल्यांदा एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले. अखेर या दोघांनी आपल्या नात्याची औपचारिक घोषणा केली.