गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (16:36 IST)

ट्विटर वॉर, दलबदलूंना प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे काय समजतील

दलबदलूंना प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे काय समजतील अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेंदीवर टीका केली आहे. सध्या त्यांच्यात ट्विटर वॉर रंगलं आहे. 
 
“एका गोष्टीचा मला पुनरुच्चार करायचा आहे. अ‍ॅक्सिस बँकेत सरकारी विभागाकडून (आधीची यूटीआय बँक) पोलीस खात्यांचे संपादन करण्याचा निर्णय फक्त बँक तंत्रज्ञान आणि सेवेच्या आधारावर घेतला गेला होता. २९ ऑक्टोबर २००५ रोजी यासंबंधी शासन आदेश निघाला होता. घाणेरडे राजकारण प्रामाणिक आणि कणखर व्यक्तींना फसवू शकत नाही” या आशयाचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
 
"अ‍ॅक्सिस बँक ही माझी घरगुती बँक नाही. ही खासगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी बँक आहे. मी त्यातील एक कर्मचारी असून बँकेसाठी १८ वर्षे काम केल आहे. संधीसाधू दलबदलूंना हा प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे समजतील? ही खाती २००५ मध्ये आधारित तंत्रज्ञान आणि सेवांनुसार देण्यात आली होती” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.