संबंधित माहिती
- पुण्यातील रिक्षाचालकांचा येत्या १ ऑक्टोबरला लाक्षणिक बंद
- लज्जास्पद प्रकार, कोविड सेंटरमध्ये काम करणा-या महिलेचा सहाजणांनी केला विनयंभग
- पुण्यात आज पाणी पुरवठा बंद, या ठिकाणी नाही येणार पाणी
- बाप्परे, पुण्यातील जंबो कोव्हिड सेंटरमधून थेट 33 वर्षीय युवती बेपत्ता, आईचे उपोषण
- राज्य सरकारकडून दुसऱ्यांदा पोलीस दलात मोठे फेरबदल
पुणे हादरले, शिवसेना दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांच्या मुलाचा खून
पुण्यातील बुधवार पेठ भागातील शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांच्या मुलाचा खून झाल्याची घटना घडली आहे. दिपक मारटकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिपक हा युवा सेनेचा पदाधिकारी देखील होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा दिपक त्याच्या काही सहकाऱ्यांसोबत कार्यालयाबाहेर उभा असताना त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. शुक्रवार पेठेतील गवळी आळी येथे मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास दिपक आणि त्याचे काही सहकारी कार्यालयाबाहेर थांबले होते. त्यावेळी पाच ते सहा जणांनी दिपकवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. काही कळण्याच्या आतच दीपक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
जखमी अवस्थेतच दिपकला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दिपकला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हा हल्ला का करण्यात आला यामागील नेमके काय कारण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.
