बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रणरागिणी संघटनेकडून रामू विरोधात तक्रार दाखल

ram gopal verma
जगातील सर्व महिलांनी सनी लिओनीचा आदर्श बाळगत तिच्याप्रमाणे पुरुषांना आनंद द्यावा असे वादग्रस्त विधान केल्यानंतर आता दिग्दर्शक राम गोपाल वर्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू जनजागृती समितीची महिला शाखा असलेल्या रणरागिणी संघटनेकडून  रामूविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.  रामूचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक करावे आणि  महिलांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाक करावा, अशी मागणी संघटनेने केली. मात्र रामूनेच त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सनी लिओनीच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्याबद्दल संघटनेविरोधात तक्रार दाखल करू असे त्याने म्हटले.