शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (11:40 IST)

रणबीर कपूर-आलिया भट्ट जोधपूरला पोहोचले, वेडिंग डेस्टिनेशन तर शोधत नाहीये हे लव बर्ड्स?

बऱ्याच काळापासून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या अफेअरमुळे जास्त चर्चेत राहिले आहेत. रणबीर कपूर 28 सप्टेंबर 2021 रोजी आपला 39 वा वाढदिवस साजरा करणार आहे. याआधी रविवार 26 सप्टेंबर रोजी रणबीर आणि आलिया राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर दिसले होते. अशा परिस्थितीत, हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत का? असा अंदाज बांधला जात आहे.
 
एक वर्षापेक्षा जास्त काळापासून रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चा होत आहे. आता जोधपूरमध्ये एकत्र दिसल्यानंतर चाहते अंदाज लावत आहेत की हे दोघेही त्यांच्या लग्नाचे ठिकाण पाहण्यासाठी आले आहेत. बरं, यासारख्या कशाचीही पुष्टी नाही, कदाचित हे दोघेही रणबीरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जोधपूरला पोहोचले असतील. पण जोधपूर हे रॉयल वेडिंग डेस्टिनेशन आहे आणि याआधी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचेही लग्न जोधपूरमध्ये झाले आहे.
 
तसे, आधी एका मुलाखतीत रणबीर कपूरने म्हटले आहे की जर कोरोना व्हायरस आला नसता तर त्याने आलियाशी आतापर्यंत लग्न केले असते. कामाच्या आघाडीवर, हे जोडपे लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.