सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (16:20 IST)

शिल्पा शेट्टी करते नव्या आयुष्याची सुरुवात

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच पुढील वाटचालीबद्दल संकेत दिले आहेत. सोशल मीडियावर शिल्पाने टाकलेल्या पोस्टमुळे ती नव्याने आयुष्याची सुरुवात करणार का? असा प्रश्र्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पोस्टमध्ये तिने चुकीचा निर्णय आणि बँड न्यू एडिंगवर भाष्य केले आहे. एका पुस्तकातील लिखाणाचा भाग तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्या माध्यमातून राज कुंद्रासोबत लग्र करणे शिल्पा शेट्टीचा चुकीचा निर्णय होता आणि आता ती नव्याने सुरुवात करत आहे असे तिला म्हणायचे आहे का? अशी चर्चा नेटिझन्स करत आहेत. 
 
या पोस्टमध्ये शिल्पा म्हणते की, कुणीही परत जाऊन नवी सुरुवात करू शकत नाही. कुणीही आतापासून नव्याने सुरुवात आणि एक अंत करू शकते. आपण भूतकाळ बदलू शकत नाही मग कितीही त्याबद्दल विचार केला तरी. परंतु आपण नव्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. तेदेखील चांगले निर्णय, जुन्या चुकीकडे दुर्लक्ष करून जे आपल्या आसपास आहेत त्यांच्यासोबत नव्याने वाटचाल करू शकतो. आपल्याकडे स्वतःला पुन्हा शोधणे आणि बदलणे यासाठी संधी आहे. माझ्या भूतकाळात जे घडले त्या गोष्टीपासून माझ्यावर परिणाम होण्याची आवश्कता नाही. माझी इच्छा आहे मी भविष्य बनवू शकते. शिल्पाच्या या पोस्टमुळे तिच्या नव्या आयुष्याची सुरूवात कशी असेल यावर चर्चा होत आहे.