राज बाहेर आल्यानंतर शिल्पाची पोस्ट व्हायरल
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी सोमवारी न्यायालयातून जामीन मिळाला. राजला अश्लील व्हिडीओ प्रकरणी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. राज यांना 2 महिन्यांनी जामीन मिळाला. आता राजला जामीन मिळाल्यानंतर पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक संदेश शेअर केला आहे.
या मेसेजमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत ते पाहून येथे असा अंदाज बांधला जात आहे की राज यांना जामीन मिळाल्यानंतरच त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये इंद्रधनुष्य दृश्यमान आहे आणि त्यावर लिहिले आहे, 'इंद्रधनुष्य हे सिद्ध करण्यासाठी असतं की वाईट वादळानंतरही सुंदर गोष्टी घडतात.' हे कोट रॉजर ली यांनी लिहिले आहे.
अलीकडेच शिल्पा माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी आली होती. या दरम्यान, व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले.
राजला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. राज यांच्यासह या प्रकरणात आणखी 11 जणांना अटक करण्यात आली. राजच्या याचिकेवर अनेक वेळा सुनावणी झाली आणि प्रत्येक वेळी त्यांची कोठडी वाढवण्यात आली, पण आता राजला जामीन मिळाला आहे.
राज कुंद्रा आता कारागृहातून बाहेर आला आहे. कारागृहातून बाहेर पडताचं राजचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये राजला टिळा लावल्याचं दिसून येत आहे.
photo: instagram