फक्त पाच रुपयांत स्वारगेट ते सहकारनगर बसमार्ग सुरू

Last Modified बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (15:34 IST)
PMPML च्या ‘अटल बस’ योजनेअंतर्गत मार्ग क्रमांक एस 9 स्वारगेट ते सहकारनगर नं. 2 शेवटचा बस स्टॉप हा नवीन बसमार्ग सुरू करण्यात आला. पुण्याचे महापौर तथा PMPML चे संचालक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते
बससेवेचे उदघाटन करण्यात आले.अटल बस सेवेअंतर्गत प्रवाशांना फक्त पाच रुपयांत ही बससेवा उपलब्ध होणार आहे.

नगरसेवक महेश वाबळे यांच्या पाठपुराव्यातून ही बस सेवा सुरू झाली. यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मनिषा महेश वाबळे PMPMLचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे,स्वारगेट आगार व्यवस्थापक राजेश कुदळे उपस्थित होते.
असा असेल बसमार्ग
स्वारगेट, लक्ष्मीनारायण टॉकीज,पंचमी हॉटेल,लक्ष्मीनगर,सारंग सोसायटी,सहकारनगर नं. 2 शेवटचा बस स्टॉप.
सध्या ही बस सेवा दर 40 मिनिटांनी उपलब्ध असून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढवल्या जाणार आहेत.

याप्रसंगी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘पुणे महानगपालिकेतर्फे PMPML च्या ताफ्यात 50 मिडी सीएनजी एसी बस देण्यात आल्या आहेत. या बसेसच्या माध्यमातून पुण्यदशम बससेवेअंतर्गत सध्या शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये 10 रुपयांत दिवसभर प्रवास ही सेवा पुरविली जात आहे. लवकरच PMPML च्या ताफ्यात आणखी मिडी सीएनजी एसी बस दाखल होतील व संपुर्ण शहरात पुण्यदशम बससेवा पुरवली जाईल.’
नगरसेवक महेश वाबळे म्हणाले, ‘शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नागरिकांनी बसचा वापर वाढवून खाजगी वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळली पाहिजे. तसेच PMPML च्या अधिकाऱ्यांनी सदरची बससेवा तत्परतेने उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.’


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

तेजस्वी यादवचं लग्न निश्चित, आज ना उद्या दिल्लीत होणार रिंग ...

तेजस्वी यादवचं लग्न निश्चित, आज ना उद्या दिल्लीत होणार रिंग सेरेमनी, संपूर्ण कुटुंब हजर
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव ...

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता होणार बाळ ...

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता होणार बाळ ठाकरेंच्या कुटुंबाची सून
सध्या भाजप आणि शिवसेनेचे राजकीय संबंध चांगले नसले तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये नवे ...

WhatsAppचे नवीन फीचर! बोलल्यानंतर आपोआप डिलीट होईल ...

WhatsAppचे नवीन फीचर! बोलल्यानंतर आपोआप डिलीट होईल प्रायव्हेट चॅट, जाणून घ्या कसे
व्हॉट्सअॅप अपडेट: बहुतेक संभाषणे समोरासमोर न राहता डिजिटल पद्धतीने होऊ लागली आहेत, पण

एसटी संपाचे 30 दिवस

एसटी संपाचे 30 दिवस
St Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अद्याप सुरू असून आज या संपाला एक महिना ...

बुलडाणा : चालकाची झोप भक्तांना महागात, टेम्पो उलटला, 35 जण ...

बुलडाणा : चालकाची झोप भक्तांना महागात, टेम्पो उलटला, 35 जण जखमी
जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी आणि परिसरातील भाविक दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे विठ्ठल ...