80 वर्षाच्या वृद्धाचा खून ’ 10 हजार रुपये देऊन केली होती विचित्र मागणी
एका 80 वर्षीय वृद्धाच्या हत्येचे प्रकरण (80 year old murder) समोर आलं आहे. एका 33 वर्षाच्या व्यक्तीवर या खूनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. या वृद्धानं कथितरित्या 10 हजार रुपयांच्या बदल्यात तरुणाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती, असं सांगितलं जात आहे. या मागणीमुळे संतापलेल्या तरुणाने रागाच्या भरात त्या वृद्धाला ढकलून दिलं आणि नंतर ठार केलं, असं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामुळे पोलिसांना (Police) आरोपींपर्यंत पोहोचणं शक्य झालं.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील (Senior Police Inspector Ravindra Patil) यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, शमाकांत तुकाराम नाईक असं मृत व्यक्तीचं नाव आहे.मृत व्यक्तीच्या नावावर दुकाने, फ्लॅट आणि प्लॉटसह कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आहे.मृत वृद्ध नाईक 33 वर्षीय आरोपीच्या दुकानात अनेक वेळा जात होता.तसेच एकादा त्यानं 5 हजार रुपयाच्या मोबदल्यात तुरूणाकडे त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती, असं वृत हिंदी वेबसाईटने दिलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अशाच प्रकारे 29 ऑगस्टला वृद्ध नाईकनं युवकाला 10 हजार रुपये देऊन त्याच्या पत्नीला गोडाऊनमध्ये पाठवण्यास सांगितलं. या मागणीमुळे संतापलेल्या आरोपीनं वृद्धाला ढकलून दिलं.यामुळे तो पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली.आरोपीनं तात्काळ दुकानाचे शटर खाली पाडले आणि नाईकचा गळा दाबून खून (Murder) केला.यानंतर त्याने बाथरुममध्ये मृतदेह लपवून ठेवला.31 ऑगस्टपर्यंत नाईकचा मृतदेह शौचालयात राहिला.पहाटे पाच वाजता आरोपीनं नाईकचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळला आणि तो दुचाकीवरुन घेऊन तलावात नेऊन फेकण्यासाठी निघाला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.आरोपीने दिलेल्या जाबाबत सांगितले की, त्यानं मृत व्यक्तीचे कपडे आणि मोबाईल कचाराकुंडीत फेकून दिले.
याशिवाय आरोपी 80 वर्षीय वृद्ध नाईक याच्या मुलासह 29 ऑगस्टला त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी गेला होता.
नाईकच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, ते 29 ऑगस्टपासून बेपत्ता झाले आहेत.त्यांचा मोबाईल फोन बंद होता.त्यामुळे वृद्धाची हत्या झाल्याचा पोलिसांना सुरुवातीला संशय होता.परंतु सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ते दुकान चालवणाऱ्या तरुणापर्यंत पोहोचले.आरोपीने मृत व्यक्तीचे फेकून दिलेले कपडे आणि मोबाईल कचराकुंडीत फेकून दिलेल्या वस्तू अद्याप सापडले नाहीत. पोलीस शोध घेत आहेत.