1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (08:02 IST)

खेड तालुक्यात तरसाचा दोन जणांवर हल्ला,थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद

Tarsa attack on two persons in Khed taluka
पुण्यात तरसाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.खेड तालुक्यातील खरपुडी गावात घडलेली ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. 
यावेळी एक तरुण वेळीच मदतीला धावून आल्याने या हल्ल्यातून वृद्ध व्यक्ती बचावले आहेत. सैरावैरा धावणाऱ्या तरासाची अज्ञात वाहनाला धडक लागली आणि त्यात तरसाचा मृत्यू झाला.
कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडीओमध्ये एक वृद्ध रस्त्यावरून पायी निघालेले दिसतायेत. तेव्हा लगतच्या झुडपातून अचानकपणे तरस बाहेर आला. पुढे पायी निघालेल्या वृद्धाचा हात त्याने अक्षरशः जबड्यात धरला.
गावातील तरुण हातात काठ्या घेऊन याच तरसाच्या शोधात होते. सुदैवाने एक तरुण तिथंच तरसाचा शोध घेत होता. त्या तरुणाने तरसाला हुसकावून लावण्यासाठी काठीने प्रहार केला. काही वेळाने तरस धावला पण त्याने वृद्धाला गंभीर जखमी केले होते.

तिथंच असणाऱ्या एकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. तसेच दुचाकीवरील आणखी एका व्यक्तीला चावा घेतला.नंतर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाच्या तोंडाला जबर मार लागला आणि जखमी अवस्थेतील तरसाचा नंतर मृत्यू झाला,अशी माहिती खेड वनविभागाने दिली.