सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (08:07 IST)

पुणे आणि आसपासच्या घाट परिसरात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

पुणे आणि आसपासच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी येत्या तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवार (दि.06) ते बुधवार (दि.08) या तिन्ही दिवशी आकाश पूर्णत: ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा तर, घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.तर,तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.दरम्यान, कोकण गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तसेच, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.