पुणे: अल्पवयीन मुलीवर बलात्कार

rape
पुणे| Last Modified सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (18:58 IST)
पुण्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालक (auto rickshaw driver) आणि त्याच्या रेल्वेच्या कर्मचारी (railway workers) असलेल्या कामगारांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्टला गावी जाण्यासाठी मुलगी पुणे स्टेशन येथे आली होती. मात्र आता रात्री गाडी नसून तुझ्या राहण्याची व्यवस्था करतो, असं सांगून रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेतलं आणि वानवडी येथे नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला.

तसंच तिला तिथेच डांबून ठेवण्यात आल्याने एक तारखेला पुन्हा रेल्वेचे कर्मचारी असलेल्या 2 चतुर्थश्रेणी कामगारांनी तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. पीडित अल्पवयीन मुलगी ही रुग्णालयात असून सध्या तिची परिस्थिती गंभीर आहे, परंतु स्थिर आहे. पीडित 13 वर्षीय मुलगी आई वडिलांसोबत वानवडीमध्ये राहते. 31 ऑगस्टच्या रात्री तिचा मित्र गावाहून तिला भेटण्यासाठी पुणे स्टेशनला येणार होता म्हणून ती पुणे स्टेशनला गेली होती. मात्र तिचा मित्र आलाच नाही. त्यानंतर तिने बाहेर उभ्या असलेल्या रिक्षा चालकाला पुन्हा गाडी आहे का? याची विचारणा करण्यासाठी गेली असता त्याने तिला घरी सोडण्याचा बहाणाकरून रिक्षात बसवून घेऊन गेला. त्यानंतर त्या रिक्षाचालकाने काही मित्रांना फोन करून बोलवून घेतलं आणि त्यानंतर दोन दिवस या मुलीवर अत्याचार केला गेला. यात 6 रिक्षाचालक आणि दोन रेल्वे चे कर्मचारी यांनी अत्याचार केला. या मुलीला मुंबईच्या बसमध्ये बसवून देण्यात आलं होतं. त्यादरम्यान पुन्हा आणखी या मुलीवर कुणी अत्याचार केलाय का याचा तपास पोलीस करत आहेत. या मुलीची तब्येत स्थिर असल्याचं उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितलं आहे.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

10 मोरांचे मृतदेह आढळून आले

10 मोरांचे मृतदेह आढळून आले
नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील (Nanadgaon Taluka)आमोदे येथील शिवारात दहा मोर (Peacock) ...

.....सावरकरांना विनम्र अभिवादन !!

.....सावरकरांना विनम्र अभिवादन !!
नसानसातुन धांवत होते देशप्रेम सळसळून, प्रखर भावना देशाप्रती होती ठासून भरून,

मामाच्या लग्नात भाच्याचा मृत्यू

मामाच्या लग्नात भाच्याचा मृत्यू
काळ कधी कुठे आणि कोणावर झडप घालणार हे कोणालाच माहित नाही. लग्नाच्या वरातीत एका मुलावर ...

चलनातील 500 आणि 2000च्या बनावटी नोटात वाढ, असे ओळखा

चलनातील 500 आणि 2000च्या बनावटी नोटात वाढ, असे ओळखा
भारतीय रिजर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात चलनात असलेल्या 500 आणि 2000 ...

एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, मृतदेह घरापासून ...

एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, मृतदेह घरापासून दूर विहिरीत आढळले
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याने खळबळ उडाली ...