सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (08:04 IST)

मुंबईत 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

बई येथील भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 17 वर्षीय मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तर या मुलीला तिच्या ओळखीच्या मुलानेच तिला फसवल्याने खळबळ उडाली आहे.या बाबत तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. आता तिन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या आरोपींना 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी  ठोठावण्यात आली आहे
 
दाखल तक्रारीनुसार भाईंदर परिसरात एक 17 वर्षीय मुलगी राहत होती. तिला तिच्या ओळखीच्या मुलाने त्याच्या घरी बोलावले. या ओळखीच्या मुलाने तसेच इतर दोघांनी तक्रारदार मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला आहे. तर अत्याचार करुन जर कोणाला सांगशील तर लक्षात ठेव अशा शब्दात पीडित मुलीला धमकीसुद्धा दिली व दबाव तयार केला.