गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (21:25 IST)

80 वर्षाच्या आजोबांना पाठवले 80 कोटीचे विजबिल, आजोबा रुग्णालयात

वाढीव विजबिल हा प्रश्न अजूनही गंभीर आहे. यातच महावितरणने अजब प्रकार केला आहे. मुंबईच्या वसई परिसरात राहणाऱ्या 80 वर्षांच्या आजोबांना वीज कंपनीने 80 कोटी रुपयांचे बिल पाठवले. विशेष म्हणजे हे बिल केवळ 2 महिन्यांचे आहे. हे पाहून आजोबांचे ब्लड प्रेशर वाढले आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
वसईतील रहिवासी गणपत नाईक यांची प्रकृती बिघडल्यानंतर आता त्यांचे कुटुंब धक्क्यात आहे. मुंबईतील वीजपुरवठा कंपनी महावितरण कडून 80 कोटी 13 लाख 89 हजार 6 रुपयांचे बिल पाठवण्यात आले आहे. नाईक कुटुंब वसईत 20 वर्षांपासून गिरणी चालवत आहे. लॉकडाऊनमुळे, त्याचा व्यवसाय असाही ठप्प झाला आहे. आता एवढ्या मोठ्या बिलानंतर कुटुंबांने पुढे काय करावे असा प्रश्न त्यांना पडला आहे.
 
पूर्वी प्रत्येक महिन्यात 54 हजारांचे बिल होते
गणपत नाईक म्हणतात की विद्युत विभाग हे कसे करू शकते. बिल पाठवण्यापूर्वी ते कोणत्या मीटरची तपासणी करत नाहीत? असे कसे एखाद्याला चुकीचे बिल पाठवू शकतात? आतापर्यंत दरमहा जास्तीत जास्त वीज बिल 54 हजारांवर आले आहे. लॉकडाउन दरम्यान गिरणी कित्येक महिन्यांपासून बंद होती, असे असुनही दोन महिन्याचे (डिसेंबर आणि जानेवारी) एवढे बिल कसे येऊ शकते.
 
विद्युत विभागाचे स्पष्टीकरण
दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने (MSEDCL) बुधवारी म्हटले की ही एक अज्ञात चूक होती आणि लवकरच हे बिल दुरुस्त केले जाईल. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र मुनगारे म्हणाले की, विद्युत मीटर रीडिंग एजन्सीकडून ही चूक झाली. याची पडताळणी केली जात आहे. एजन्सीने 6 ऐवजी 9-अंकी बिल तयार केले होते.