Mumbai मध्ये रजनीकांत स्टाईल डोसा Viral Video
मुंबईत असाल आणि स्ट्रीट फूडची चाखण्याची आवड असेल तर प्रसिद्ध मुथु डोसा कॉर्नरला भेट नक्की द्या कारण सध्या सोशल मीडियावर रजनीकांत स्टाईल डोसा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मुथु डोसा कॉर्नर येथे मसाला डोसा आणि मैसूर डोसा खाणार्यांची गर्दी असते. डोसा तयार करण्याची पद्धत, चव आणि त्याहून भारी देण्याची स्टाईलमुळे आकर्षण अजून वाढतं. सुपरस्टार रजनीकांत यांचे फॅन मुथु यांनी डोश्याला रजनीकांत स्टाईल डोसा असे नावा दिले आहे. या व्हिडिओ बघून अनेक फूड लव्हर्सच्या तोंडाला पाणी सुटतं आहे तर काही 30 वर्षांपासून या कामात असलेल्या मुथु अंकलचे कौतुक करत आहे.
स्ट्रीट फूड रेसिपी नावाच्या एका फेसबुक पेजने हा व्हिडिओ अपलोड केला असून सध्या खूप व्हायरल होत आहे. पाहा व्हिडिओ...
या व्हायरल व्हिडिओला 1.5 मिलियन्सहून अधिक लाइक्स मिळालेले आहेत तर तीस हजारपेक्षा अधिक कमेंट्स असून लोक मजेशीर कमेंट्स करत आहे.
या डोश्याचा स्वाद घेण्यासाठी मुंबईच्या दादरमधील हिंदमाता येथील मुथु डोसा कॉर्नरवर जावं लागेल आणि रजनीकांत स्टाईल मध्ये आपल्याला डोसा सर्व्ह केला जाईल.
फोटो साभार- Street Food Recipes Facebook