शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (09:13 IST)

नराधमाला सात दिवसांच्या आत 'इंडिया गेट' समोर फाशी द्या

hathras gang rape
हाथरस बलात्कार प्रकरणी मनसेच्या सरचिटणीसपदी असणाऱ्या शालिनी ठाकरे, यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक लक्षवेधी पोस्ट लिहित पीडितेवर अत्याचार करणाऱ्या प्रत्येक नराधमाला सात दिवसांच्या आत दिल्लीतील 'इंडिया गेट' या वास्तूसमोरील चौकात फाशी द्या अशी स्पष्ट मागणी केली आहे. 
 
इतकंच नव्हे, तर महिलांच्या अब्रूवर घाला घालणाऱ्या या नराधमांच्या लटकत्या मृतदेहांना दगड मारण्याची परवानगी महिलांना द्या जेणेकरुन कोणत्याही जात- धर्मापेक्षा या देशातील कायदा हा महिलांच्या इज्जतीला जास्त महत्त्व देतो हे सर्व प्रकारच्या विकृत पुरुषांना कळू दे, असा संतप्त सूर त्यांनी आळवला.