शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (08:22 IST)

खंडणीचा अजब प्रकार,आईच्या प्रियकाराकडून मुलीनं मित्राच्या मदतीनं उकळली खंडणी

आईच्या प्रियकाराकडून मुलीनं तिच्या मित्राच्या मदतीनं खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आलाय. मुलीला आईच्या प्रेमाचा सुगावा लागताच तिनं आईचा व्हॉट्सअप हॅक केला.तिचे आणि तिच्या प्रियकराचे काही फोटो आणि अश्लील व्हिडीओ मिळवले.नंतर आपल्या मित्राच्या मदतीनं ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरु केला. फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत ती आणि तिच्या प्रियकरानं आईच्या प्रियकराकडे 15 लाखांची खंडणी मागितली. 
 
विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याला 1 लाखांची खंडणी देताना मुलगी आईच्या प्रियकरासोबतही असायची.पैसे देऊन एकदाचं प्रकरण मिटवून टाका,असा सल्ला तिनंच आपल्या आईला दिला होता. मात्र खंडणीला वैतागलेल्या आईच्या प्रियकरानं पोलिसात धाव घेतली आणि मुलीचं बिंग फुटलं. 
 
या प्रकरणात कुरबावीतल्या मिथुन गायकवाडसह कर्वेनगर परिसरातील तरूणीला अटक करण्यातआलय. आईसोबत प्रेमसंबध ठेवणार्‍या व्यक्तीला धडा शिकविण्यासाठी तिनं हा सगळा बनाव केला होता. बदनामीच्या भीतीनं आईचा प्रियकर असलेल्या व्यावसायिकानं तरूणीच्या मित्राला 2 लाख 60 हजार रूपये देखील दिले.