बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

माधुरीच्या 'बकेट लिस्‍ट'मध्‍ये रणबीर कपूरचा कॅमियो रोल

माधुरी दीक्षितच्‍या 'बकेट लिस्‍ट'मध्‍ये अभिनेता रणबीर कपूरची भूमिका पाहायला मिळणार आहे. रणबीर या मराठी चित्रपटात फक्‍त कॅमियो रोल करणार आहे. माधुरीने याआधी रणबीर कपूरच्‍या 'ये जवानी है दिवानी' चित्रपटात एका गाण्‍यावर डान्‍स केला होता.  'बकेट लिस्‍ट' तेजस प्रभा विजय देओस्कर यांनी दिग्‍दर्शित केला असून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.
 
रणबीर कपूर माधुरी दीक्षितचा मोठा चाहता आहे. त्‍याने खुद्‍द एका मुलाखतीत सांगितले होते. मुलाखतीत रणबीरला माधुरीसोबत 'ये जवानी है दीवानी'मध्‍ये काम करण्‍याचा अनुभव विचारण्‍यात आला होता. त्‍यावेळी रणवीर म्‍हणाला,'मेरा दिल सिर्फ एक महिला के लिए धडकता है और उनका नाम माधुरी दीक्षित है'
 
रणबीरकडे 'बकेट लिस्‍ट'ची स्‍क्रिप्‍ट पोहोचली. त्‍यावेळी त्‍याने लगेच होकार कळवला. 'बकेट लिस्ट'ला करण जौहरने प्रोड्यूस केलं असून माधुरी सोबत सुमित राघवनची मुख्‍य भूमिका असणार आहे. शिवाय, रेणुका शहाणेचीदेखील भूमिका पाहायला मिळणार आहे.